‘चौफेर’: माहिती, विश्लेषन आणि संवेदनशीलता यांची चांगली गुंफण
आपल्या सभोवती सतत काहींना काही घडत असते. यातील काही बाबी या
आपल्याशी थेट संबधित तर काही थोड्याफार
दूर असतात. त्यांचा आपल्यावर कधी थेट तर कधी अप्रत्यक्ष प्रभाव राहतो.
त्याची चर्चा होते आणि कधी त्याचे परिणाम पाहावे लागतात. निसर्ग, वन्य- जीवन,
क्रीडा, साहित्य, मानवी हक्क हे विषय सतत काही तरी माहिती देत असतात आणि त्याचे
प्रतिध्वनी उमटताना दिसतात. याचा आपल्या जगण्याशी खूप जवळचा संबध असतो. याचा वेध
घेत राहणे हे तितके सोपे नसते.यासाठी निसर्ग-वन्यजीवन, क्रीडा, साहित्य, मानवी
हक्क यांची आवड असावी लागते. यातील संवेदना जाणून घेता आली पाहिजे. हे काम
तसे सोपे नसते आणि त्यात सातत्य ठेवणे अत्यंत कठीण असते. यासाठी वेळ आणि पैसा खर्च
करून काही नवे शिकण्याची आणि समजून घेण्याची तयारी ठेवावी लागते. विलिंग्डन कॉलेज,
सांगली येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पोंदे यांनी मात्र हा प्रयत्न
करून आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. त्यांनी २००५ पासून ‘सकाळ’, ‘पुढारी’, या
कोल्हापूर मधून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांमधून सातत्याने विविध विषय अतिशय
माहितीपूर्ण आणि विश्लेषन पद्धतीतून मांडून, हे काम केले आहे. त्यांनी विविध लेख
हे ‘चौफेर’ पुस्तकाद्वारे प्रकाशित केले आहेत. हा लेखसंग्रह कोल्हापूर मधील प्रारूप
पब्लिकेशन यांनी प्रकाशित केला आहे.
या पुस्तकात लेखांचे विषय विचारत घेऊन लेखकाने
त्याचे चार विभागात विभाजन केले आहे.
यातील पहिला भाग हा निसर्ग जीवन-वन्यजीवन यावर असून यात एकूण १७ लेखांचा समावेश आहे.
दुसऱ्या विभागात क्रीडाविश्वाची चर्चा २८ लेखाद्वारे केलेली दिसून येते. मानवी हक्क यावर एकूण ५ तर
साहित्यावर १० लेख लिहिले आहेत. लेखकास मुळात वन्यजीवन आणि प्राणी यांची मनापासून
आवड आहे. ‘कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तीची हत्त्या?’ आणि ‘हत्ती अभयारण्याचे स्वप्न
मावळेले’ हे त्यांचे दोन लेख आपली
प्राण्यांबद्दलची निष्काळजी दाखवितात. २००६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटक-
गोवा सीमावर्ती भागातून रानटी हत्ती प्रवेशकर्ते झाले होते आणि त्यांनी चंदगड
तालुक्यात ऊस शेतीचे नुकसान केले होते, ही वस्तुस्थिती होती. यातील चार हत्ती हे
मरण पावले त्याचे गूढ अद्याप उकलेले नाही. हा प्रश्न वन खात्याला नीट हाताळता आला
नव्हता. या जंगल हत्तींची संख्या २५ पेक्षा अधिक होती, त्यामुळे हत्तीचे अभयारण्य उभे
करण्याची संधी गमावली गेली.याशिवाय गिधाडे, बिबटे, व्याघ्र प्रकल्प, हे लेख माहिती
आहेत. कोपनहेगनचा अन्वयार्थ आणि पर्यावरण संतुलनाची गरज या लेखातून लेखकाची सार्थ
चिंता दिसून येते.
निसर्गाइतकेच महत्व हे
क्रीडाविश्वाला आहे. आपल्याकडे खेळ आहेत पण त्याला व्यवस्थापन नाही. खेळाडू आहेत
पण त्यांना प्रशिक्षण सुविधा नाहीत. यातूनही एकादा खेळाडू हा स्वत:चे कर्तृत्व
सिद्ध करतो. हे डोळ्यासमोर ठेऊन लेखकाने क्रीडा व्यवस्थापनासारखा विषय हाताळला
आहे. तर ‘दोहा आशियाई स्पर्धा: खेळाचे राजकारण’ या लेखातून वास्तव चित्र मांडण्याचा
प्रयत्न करताना दिसतो. आपल्याकडे क्रिकेटचा बाजार झाला आहे यातून खेळाडू हे अधिक
बेजबाबदार झाले आहेत, हे मांडण्यात लेखक कमी पडलेला नाही. तसेच तो या क्षेत्रातील
नव्या आव्हानांचा विचार करतो आहे, हे अधिक महत्वाचे आहे.
डॉ. पोंदे हे मानवी हक्क याबाबतही जागरूक आहेत. या पुस्तकात त्यांनी
यासाठी स्वतंत्र विभाग केला असून त्यात एकूण पाच लेख आहेत. मानवाधिकार: उत्क्रांती
ते बाल हक्क चळवळ असा त्याचा आवाका आहे. मानवधीकाराचा होत गेलेला विकास यातील
संघटना, त्यांचे कार्य आणि यातील राज्य व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली
आहे. बाल हक्क आणि त्याचे संरक्षण हा सुद्धा तेवढाच महत्वाचा विषय आहे. त्याची
नोंद लेखकाने एका लेखाद्वारे घेतली आहे. मानवी हक्कांसाठी लढा हा लेखही वाचनीय
आहे. बालहक्कांच्या चळवळीसाठी कार्य करणारे श्री. कैलाश सत्यार्थी यांना २०१४ मध्ये ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला,
त्याची नोंद ही लेखकाने ‘नवे पर्व’ या यथार्थ शब्दात केली आहे.
लेखक हे इंग्रजीचे अध्यापक आहेत, त्यामुळे त्यांनी साहित्यातील
घडामोडीची नोंद घेणे, हे क्रमप्राप्त आहे. ‘साहित्य आणि व्यक्तिविशेष’ यामध्ये
त्यांनी भारतीय इंग्रजी लेखक डॉ. मुल्कराज आनंद, शशी थरूर, मनोहर माळगावकर, विल्यम
गोल्डिंग, नायपाँल यांच्या लेखन योगदानाचा चांगला आढावा घेतला आहे. तसेच त्यांनी
अर्नेस्ट हेमिग्वे आणि पाश्चात्य नाटककारांना न्याय दिला आहे. हे पुस्तक वाचत
असताना लेखकाची बहुश्रुतता लक्षात येते. समकालीन क्रीडा, वन्यजीवन, मानवी हक्क,
साहित्य यावरील सर्व लेख ओघवत्या भाषेत असल्याने, ते अधिक वाचनीय आहेत.
---------------------------------
A Choupher Marathi
book: Information, Analysis and good Sensitivity of Interlacing
.
Some things are constantly happening around us. Some of them are
directly related and other keep distance from us. Yet few directly and
indirectly impact on our life. We discuss on it and faced its impact. Nature,
Forest life, Sports, Literature, and Human Rights are disciplines always providing
information and then we see its reflection on the society. We are closely
connected to these aspects. To take
constant review of these aspects is very difficult. For this we are required to
have a keen interest in the Nature, Forest life, Sports, Literature and Human
Rights along with sensitivity. This is not an easy task because a continuous
follow-up is hard and inconvenience for it takes both a huge money and time.
Dr. Rajendra Ponde, an English teacher from Willingdon College, Sangli,
has made these efforts on this line and proves his different type of qualities.
From 2005 he wrote several articles in Marathi language through Sakal
and Pudhari the two dailies published from Kolhapur. He wrote all the
articles with information, analysis. Recently, he edited and published his book
in Marathi namely Choufer where all articles got proper and sufficient
space. The book Choupher was published by Prarup Publication, Kolhapur,
2016.
In this book the writer has divided all articles into four divisions.
First division has covered 17 articles on Nature and Forest life. The second is
devoted to Sports with 28 articles. The third division has focused on Hunan
Rights. And the last division discusses on Literature and Writers. The writer,
Dr. Ponde seems to have a keen interest in and empathy with Forest and Animals,
so he attempts to give justice to problem of Elephants’ in Kolhapur district.
He wrote two separate articles on it. Hattinchee Hattya, (Killings of Elephants)
and Hatti Abhyarnyache Swapna Mavalele (Dream of Elephants Sanctuary is
Gone) these two articles show our negligence about animals. In 2006 nearly 25
wild elephants entered in Chandgad Taluka from border of Goa and Karnataka.
These elephants destroyed sugarcane plantations in same Taluka. The four
elephants died and the investigations did not find the exact reasons of their
death. The forest department failed to
handle this issue and lost an opportunity to develop a separate forest for
them. The writer’s other articles on Tigers, Vultures and Leopards. He also
wrote on the Kopahegan Conference and Environmental issues and shows his
sensitivity.
A sport has important status as equal to nature. We have the games
without its management. Players are not getting training facilities. Player
proves his/her quality in the worst circumstances. Dr. Ponde also comments on
this issue. He wrote on ‘Doha Asian games and its Politics’ where he tries to
show a real picture. He criticized cricket and its marketing and maintained
that our cricket players have become irresponsible for their performance. The writer draws attention to the challenges
of sports; this seems to be more relevant for us.
The writer is very sensible and sensitive about Human Rights issues. He
gives the separate section consisting of five articles. He explained the
development of Human Rights and Rights of Children’s. He gave the justice to
organization which was contributed with their work. According to him state has
responsibility to protect all organizations which are working for Human Rights
activities. Shri. Kailash Styarthee,a Nobel Laureate, worked for rights of
children’s. He honoured with Nobel Peace Prize in 2014. The writer’s article on
it entitled as Nave Parv in proper Marathi word.
Dr. Ponde is teacher of English, so he touched new development of
literature with separate section in this book. He wrote on the Indian English
writers namely Dr. Mulkraj Anand, Sashi Tharoor, Manohar Malagonkar for their
contributions to the development of Indian English Literature. He took review
on William Golding, and V. S. Naipaul and other playwrights from western
countries, especially America. After the reading of this Marathi book readers
will get idea about writer’s comprehensive views. The language flow is so nice
and smooth that the book will give pleasure and knowledge to readers.
Dr. Sanjay Ratnaparakhi
Email:rsanjay96@hotmail.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा