मातृभाषेतून शिक्षण हा आपल्या पिढीचा मोठा ठेवा आहे. आपल्या पिढीतील बहुतांश लोक हे न.पा, जि.प, किंवा स्थानिक शाळेत शिकलेले आहेत. घरी मराठी, शाळेत मराठी, मित्रांमध्ये मराठी, सिनेमे, नाटके, आकाशवाणीवरील कार्यक्रम मराठी. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया सुलभ झाली. भाषा आपण घरी,दारी, शाळेत, समाजातून शिकत असतो. यासर्व घटकांनी मातृभाषा समृद्धपणे शिकण्यास मदत केली आहे. मी म्हणतो आपण त्यांचे ऋण मान्य केले पाहिजे.
माझे प्राथमिक शिक्षण वारणा विद्यामंदिर,वारणानगर आणि माध्यामिक शिक्षण हे कोडोली हायस्कूल, कोडोली, जिल्हा कोल्हापूर येथे झाले. वारणानगरच्या शाळेत मालती गुणे यांनी शिक्षण, मातृभाषा यांची गोडी लावली. मराठी हा माझा आवडीचा विषय झाला,याचे श्रेय गुणे मॅडमना देईन. अक्षर वळणदार यावे म्हणून त्या अभ्यासात रोज शुध्द लेखन काढायला सांगत. मी अतिशय वळणदार अक्षरात ते पाटीवर काढत असे. काही वेळा माझे हस्ताक्षर सर्व मुलांना दाखवित. त्यावेळी उगाचच हर्ष वायू होत असे. मला त्यांनी अवांतर वाचनाची सवय लावली.ही पुस्तके अर्थात मराठी होती. यातून प्रेरणा घेऊन लेखक राजा मंगळवेढेकर यांचा 'कथाकथन' संग्रह वाचून काढला होता.
कोडोली हायस्कूल मध्ये आल्यानंतर रोज वर्तमानपत्रे आणि अग्रलेख वाचण्याची सवय लागली. शाळा मराठी माध्यमाची आणि माध्यम वाचन यातून नवे रस्ते दिसू लागले. इयत्ता नववीत असताना गजानन जहागीरदार यांचा 'कलेचा प्रभाव' हा धडा होता. आम्हाला तो काईंगडे सरांनी अप्रतिम शिकविला. मराठी चित्रपटाचा इतिहास सांगून हा धडा शिकविल्याने आजही तो स्मरणात राहिला. यातील काही आशय हा पुढे विश्राम बेडेकर यांच्या 'एक झाड दोन पक्षी' या आत्मचरित्रात वाचायला मिळाल्या.
मराठी मातृभाषा, कथा, कादंबरी, वृत्तपत्रीय वाचन हे मातृभाषेतून सुरू झाले.हा प्रवास इंग्रजी साहित्यापर्यत आला. शालेय जीवनात जग समजून घेण्यासाठी मातृभाषेने मोठी मदत केली. राष्ट्रीय चळवळ, आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचे वाचन आणि आकलन हे मराठीतून अधिक चांगले झाले. विशेषतः महाविद्यालयीन शिक्षणात महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ यांची पुस्तके हा मोठा आधार होता. प्लेटो,अॅरिस्टाॅटल, हेगेल, कार्ल मार्क्स यांचे वाचन मराठीतून करता आल्याने ज्ञानसखोलता मिळविता आली.
मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना आपल्याकडे नीटशी राबविली गेली नाही. इंग्रजी हे चांगले आले यात वाद नाही. परंतु आकलन प्रक्रियेत मातृभाषा अधिक मदत करते. आपण लहानपणी खेळताना पडत होतो आणि खरचटले की, शब्द उमटायचा 'आई'! हे नातं आपल्या मायमराठीशी आहे आणि ते राहणारही आहे.
डॉ. संजय रत्नपारखी

सर, तुमच्या संवादाप्रमाणेच लेखनही ओघवते आहे.
उत्तर द्याहटवा