स्त्रीने कसे असावे?/ कसे नसावे?
भारतीय समाज हा अनेक स्थित्यंतर स्वीकारत पुढे जात राहिला आहे.
ही प्रक्रिया १९व्या शतकात सुरु झाली. विसाव्या शतकात ही प्रकिया अधिक पुढे गेली.
आज आपण २१वे शतक अनुभवत आहोत. हे शतक सुरु होऊनही पहिले दशक संपले आहे. याकाळातील
प्रगती, तंत्रज्ञान याचा मोठा लाभ घेत आहोत. तंत्रज्ञान हा आपल्या जगण्याचा भाग बनला
आहे आणि तो आनंदाने स्वीकारला आहे. यात
जीवन अधिक सुकर होताना नवे प्रश्न तयार होत आहेत. यातील काही प्रश्न हे कुटुंब
टिकण्याचे असतात, तर कधी व्यसनाचे असतात.
आज भौतिक प्रगती वाढत असताना आपली कुटुंब
व्यवस्था टिकणार की नाही, असे प्रश्न पुढे येत आहेत. १९९० नंतरच्या आर्थिक
सुधारणा, मुक्त वावर आणि सोशल मिडिया
यामुळे आपली जीवन पद्धती बदलून गेली आहे. यात आपण म्हणाल तर एकटे आहोत आणि म्हणाल
तर बंधात आहोत. या सर्व बदलत्या स्थितीत आपण कसे असावे? आणि कसे नसावे? हा मोठा
प्रश्न आहे. याच प्रश्नाचा एक भाग असलेल्या ‘स्त्री’ बाबत काही भूमिका मांडण्याची संधी मला देण्यात आली. या
प्रश्नाकडे मी व्यापक अर्थाने पाहतो. आपला समाज हा पारंपारिक असल्याने ‘स्त्री’
आणि ‘पुरुष’ यांचा विचार याच पद्धतीने झाला आहे. यातील प्रभाव काही प्रमाणात कमी
जरी झाला असला तरी तो टिकून आहे, हे
नाकारता येत नाही. आजच्या याकाळात हा विचारही आपल्याला याच चौकटीत करावा लागतो
आहे. स्त्री कशी असावी? / कशी नसावी ? याची मांडणीही याच चौकटीत करावी लागेल.
‘स्त्री’ कशी असावी? या
प्रश्नाचे उत्तर ती सुंदर असावी हे पारंपारिक
प्रभावतील उत्तर झाले. जन्माला येणारी प्रत्येक स्त्री ही सुंदर असेल असे नाही.
तसे ते नाही म्हणून हा प्रभाव टिकून आहे. आपण सुंदर आहोत किंवा नाही हे जगण्यातील
वास्तव राहते. ते स्वीकारून पुढे आत्मविश्वासपूर्वक जगण्याची तयारी हवी. आपण सुंदर
नाही, या न्यूनगंडाने अनेक महिला या पछाडलेल्या असतात. हा प्रभाव चुकीचा आहे,
यासाठी खूप उदाहरणे आहेत. आपली चंदेरी दुनिया ही सैादर्यवादाची पूजक आहे. यात ही काही
अपवाद दिसून येतात. स्मिता पाटील ही अभिनेत्री काळी-सावळी होती आणि तिने केवळ
आपल्या अभिनयावर स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले. हे वेगळेपण सिद्ध करण्याची संधी
प्रत्येक अ-रूपवान स्त्री घेऊ शकली पाहिजे. आपल्यातील वेगळेपण जाणून घेणारी स्त्री
ही अधिक समर्थपणे जीवन जगू शकेल यात शंका नाही. माझ्या मते आपल्याला आपली खरी ओळख
व्हायला हवी आहे. ही जाणीव शिक्षण, जागृती, सोशल मिडिया यातून होण्याची गरज आहे. स्त्री कशी असावी? या प्रश्नाचे पहिले उत्तर ती आत्मभान असलेली
हवी हे आहे. हे आत्मभान वाढू शकेल अशी अनुकूल परििस्थती तयार करण्याकडे प्रयत्न
हवेत. ते होताना दिसत नाही आणि या गोष्टींचा आग्रह हा स्त्री वर्गाकडून होताना
दिसत नाही.
How to be a woman? / How to be?
Indian society is the transition was going
to accept many. This
process was started 19th century. This process has been more along the
twentieth century. Today,
we are experiencing the 21st century. This is the end of the first decade of the
century starts. During
the time we are taking great advantage of the course, technology. Technology has become a part of your life
and it is accepted with joy. There
are not easy to create a new question was more to life. Some of these questions are the family
life, but they are sometimes addiction. While this is not the
last in his family growing up in physical development, the questions are coming
forward. 1990
then the economic development, social media, and this has been changing your
life sitting free methods. It
said if you're going to say if we are alone and tied up. All of this should be changing how you
position? And
how not? This
is the big question. I
was given the opportunity to try some of the same question about the role of
'woman' with a part. The
problem I see broad sense. Since
our Indian society is the traditional idea of 'woman' and 'man' is the same
way. Even
though these were somewhat less effect it has to survive, it cannot be denied. Today, we have to think during this same
window. How
should she? /
What should not? The
structure will have to be in the same window.
How should 'woman'? The answer to this question was that it
should be answered in the traditional impact of beautiful. Not every woman is born to be beautiful. So as to not survive the impact. The fact remains that life or you are not
beautiful. They
accepted the need for further confidence survival. You do not beautiful, or many women are in
imperative complex. This
effect is wrong, for there are a lot of examples. Our filmy world is beauty worshippers. There are some exceptions to this are
evident. The
actress Smita Patil knows about the black. And she had just proved her acting
on her own uniqueness. Every
woman should be able to take this opportunity to prove uniqueness A-handsome. The more of us who live in the midst of
life, she will learn different no doubt. You should be with your true identity in my
opinion. This
awareness education, awareness, social media, leads to the need. How should she? The answer to the first question is that
the desired for confidence with reality.
These
efforts would create favourable status that can grow confidence. Our efforts are required on this direction
but women class is not insistence on this issue.
(‘स्त्रीने कसे असावे/ कसे नसावे’ या मूळ लेख महिलादिनासाठी लिहिला
होता.त्याचे English
version आहे.)
Dr. Sanjay Ratnaparakhi, Mumbai.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा