शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

आचार्य अत्रे यांचे स्मरण

 
  आचार्य प्र. के अत्रे हे मराठी साहित्यातील एक मोठा  अध्याय होता. ते शिक्षक होते, पत्रकार होते , ते नाटककार होते , ते  वक्ते होते आणि  त्याही पेक्षा ते एक मोठे माणूस होते. त्यांनी जीवनातील असे कोणतेही क्षेत्र ठेवले नाही की, ज्यावर त्यांची मुद्रा उमटली नाही, असे अत्रे यांचे स्मरण हे  आनंददायक  आहे. मी त्यांना पहिले नाही की ऐकले नाही. मी जन्माला आलो आणि अत्रे यांचे १९६९ मध्ये निधन झाले. मी त्यांचे विनोद हे माझ्या मित्रांकडून ऐकले होते. प्राथमिक शाळेत असताना ' तो मी नव्हेच' आणि ' मोरूची मावशी' ही नाटके पहिली होती. याच वेळी हे लक्षात आले होते की, ते विनोदी लेखक होते. माझे वडील हे अत्रे यांचे वाचक होते. अनेकवेळा त्यांच्या तोंडी ही अत्रे यांचे नाव असे. ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ हे त्यांनी वाचले होते. ‘मराठा’ या वृत्तपत्राचा जन्म हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झाला. त्यावेळी यास आर्थिक मदत हवी होती म्हणून लोकांनी रु १/- मनिआँडर  पाठवावी असे आवाहन अत्रे यांनी एका सभेत केले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आणि लाखो रुपये उभे राहिले. यात योगदान देणाऱ्यात माझे वडील होते आणि याचा त्यांना अभिमान होता.
  मी १९७५ पासून वर्तमानपत्रे वाचत होतो आणि राजकीय आणि सामाजिक जाणीव जागृत करत होतो. याच दरम्यान आणीबाणी आली.१९७७ मध्ये निवडणुका होऊन केंद्रात कॉंग्रसची सत्ता जाऊन जनता राजवट सुरु झाली. याकाळात वृत्तपत्र वाचन अधिक दृढ झाले. हे वाचन मला पुढे  कथा, कादंबरी वाचनाकडे घेऊन गेले. वाचनाची गोडी कळाली आणि त्याचे महत्व समजत गेले. मी १९७७ जून मध्ये कोडोली हायस्कूल मध्ये विद्यार्थी म्हणून गेलो. ही शाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत चाले. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाचनास वेळ मिळे. दिवाळी आणि मे  महिन्यात  वाचनास अधिक वेळ मिळे. मी सातवीत परीक्षा दिली आणि सुट्टी पडली म्हणून कोडोली येथील दत्त वाचनालयात नाव नोंदवले. मी ‘श्रीमानयोगी’, ‘मृत्युंजय’ या मोठ्या कादंबऱ्या वाचल्या. मी  हे जे काही वाचत होतो ते  वडिलांना सांगत असे.   मी अत्रे यांचे  ‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र वाचवे, असे वडिलांनी सुचविले. मी दुसऱ्या दिवशी वाचनालयात जाऊन ते मिळविले. ‘कऱ्हेचे पाणी’ खंड १ यातील  दोन प्रकरणे वाचली आणि आठ दिवसात तो खंड वाचून संपविला. मी हा खंड वाचताना एवढा भारवून गेलो की, काही विचारण्याची सोय नव्हती. संपूर्ण सुट्टीत ‘कऱ्हेचे पाणी’चे चार खंड वाचून पूर्ण केले. यातून मला आधुनिक महाराष्ट्र कळण्यास मदत झाली. राम गणेश गडकरी, काकासाहेब लिमये, केशवराव जेधे, काकासाहेब गाडगीळ, दत्तोपंत पोतदार या व्यक्तींचा आणि ब्राम्हणेत्तर चळवळ यांचा परिचय झाला. यातून माझा  वैचारिक आणि गंभीर वाचनाचा माझा प्रवास सुरु झाला. याचे श्रेय मी अर्थातच आचार्य अत्रे यांना देतो.

                                                                                                       डॉ.संजय रत्नपारखी,
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  Remember Aachary Atre*


   Aachary Pralhad Keshav Atre was a big chapter in Marathi literature. He was a teacher, Play writer, Orator and beyond that a big human being. He was impacted on all aspect of life. Remembering good memory of Aachary Atre is a pleasure one. I have never saw and heard to him. I was born he took exit in 1969. I had listened his jokes and humors from my friends. I saw his two Marathi plays i.e   To mee nhvech and Moruchee Mavashee in my school days. I realized that he was a comic play writer. My father was reader of Atre and he always quotes his name. He was reader of Weekly Navyug and Daily Maratha. The news paper Maratha was born during Samyukta Maharashtra movement.  Atre was appealed to the masses for financial help so lot of peoples gave him Rs.1/- through money order and lacks of rupees were collected. My father was one of the contributor and   he always pride for this help.

    I developed my political and social awareness through news paper since 1975. During the emergency period general election was declared in 1977 and Congress government was replaced by Janata Party. My news papers reading became very keen and motivated towards the other reading of stories, novels and developed my reading richness and realized importance of reading. I have joined Kodoli High School as a student in June 1977. My school timing was 11 A. M to 5.P.M. So, I enjoyed more time for my readings. Deepavali and summer vacations gave me more time for this activity. I had completed my 7th standard examination and after that enrolled for membership of Datta Vachnalay, Kodoli. I enjoyed two big Marathi novels i.e Shriman Yogi and Mrutunjay. I shared my reading with my father. My father suggested me to read Karheche Panee Autobiography of Aachary Prlhad Keshv Atre. Next day, I went to library and obtained Karheche Panee vol-1 and read first two chapters. I was full inspired and within eight days finished it. My entire vacation was spending other four volumes of Atre’s autobiography. After the reading I understood a modern Maharashtra. I realized personalities like Ram Ganesh Gadkari, Kakasaheb Limaye, Keshvaro Jedhe, Shankaro More. Kakasaheb Gadgil, Dattopant Potdar and more information about Non-Brahmin movement. After this I started my serious and intellectual reading journeys which still continue in my life. Defiantly, I am giving this credit to Aachary Atre. 


                                                               Dr. Sanjay Ratnparakhi 
                                                               Email:rsanjay96@hotmail.com

                                                               (* above English text is dependent on Marathi version)

 

४ टिप्पण्या:

  1. डाॅ रत्नपारखी, आचार्य अत्रेंवरील आपला ब्लाॅग वाचला ,खूप आवडला. क-हेचे पाणी वाचल्यामुळे माझा दहावीचा फर्स्ट क्लास गेला याचे मला अजिबात दुःख नाही. कराडला गुळाच्या मोठ्या अडतीचा मालक असलेला माझा काळे नावाचा मित्र मला आठवतो, त्याच्या वडीलांच्या संग्रहात नवयुगचा दिवाळी अंक होता, मी तो पाहिला, वाचला होता. वनमाला सावंतांचे वडील संस्थानिक, बाईंनी श्यामची आई मधे काम करू नये असे त्यांचे मत, खूप विरोध केला त्यांनी. पण सिनेमा पाहाताना ते खूप रडले व त्यांनी नंतर मुलीचे खूप कौतुक केले. अशा रीतीने सुशिक्षित, गरीब मध्यमवर्गीय घरातून आलेली पण त्यामुळेच जुन्या वळणाची स्त्री न आवडता सरंजामशाही चौकटीत राहिलेली पण आधुनिक जीवनशैलीप्रमाणे जगण्याचे धाडस दाखवू शकलेली स्त्री अत्रेंना आवडली आणि उघडपणे विवाहाबाहेरील वैचारिक प्रेम पुण्यासारख्या अशा बाबतीत बुरसटलेल्या विचारांच्या शहरात करून अत्रेंनी आजतागायत विशिष्ठ विचार करणा-या वर्गाचा रोष ओढवून धेतला आणि बहुधा त्यामुळेच झी वाहिनी आणि तत्सम परीघाने फक्त पु ल हे एकच विनोदी लेखक होवून गेले असे आजच्या तरूण वर्गाच्या मनावर बिंबवलेले दिसते. वास्तविक पाहाता श्री कृ कोल्हटकर, अत्रेंचे गुरू गडकरी, चिं वि जोशी यांसारखे श्रेष्ठ दर्जाचेे विनोदी लेखन या वर्गाने हेतूतः दुर्लक्षित राहील असे पाहिले व आजही तीच स्थिती आहे. म्हणजे एखादा लेखक माणूस म्हणून आवडला की झाले, त्याचे साहित्यिक गुण कमी महत्वाचे .... मराठी जगच असे आहे की काय ? माझ्याकडे अत्रेंची ध्वनीफीत आहे, मी ऐकवेन तुम्हाला. किती मराठीच नव्हे तर भारतीय लेखक आहेत , अगदी टागोरांसहित की वसंतसेनेसारखा सिनेमा काढल्यामुळे झालेले कर्ज, भावाची झालेली फसवणूक व त्यासाठी बायकोचे दागिने विकून केस लढून जिंकणे, के असीफ सारखा पाकीजाचा सहनिर्माता मराठी लेखक असलेल्या निर्मात्याच्या कंपनीत पडदे गोळा करायला असणे ... उद्धव शेळकेंच्या 'साहेब' मध्ये सगळे वर्णन आहे पहा. खूप खूप धन्यवाद अत्रेंचे स्मरण केल्याबद्दल. असा माणूस मराठी सारस्वतात पुन्हा होणे नाही असे त्यांच्याच स्टाइलने म्हणावेसे वाटते. राजाराममधे स्नेहसंम्मेलनास जाण्याअगोदर धर्मांध युवकांनी काळे फासले. तसेच रुमालाने पुसून, त्याच युवकांना उद्देशून म्हणाले (मुले स्टेज समोर व मुली वर गॅलरीमधे ) " हे स्वर्गस्थ देवतांनो व ह्या मर्त्य मानवांनो " आणि ते युवक हसता हसता खजील झाले. फर्गसन्चे प्रा रॅं पराजपे ग्रेट , त्यांनी सायन्स प्रवेशास पात्र गुण अत्रेंनी मिळवलेले असूनदेखील त्यांना समजावून सांगितले व कला शाखेतच राहायला सांगितले ...

    उत्तर द्याहटवा
  2. I posted our conversation on Facebook , will enter friends scholars ' comments here .. my conversation with them .. I have given link to your blog there too :
    Me:
    Most importantly he was a TEACHER par excellence (पा एक्सलाॅं)

    Dr Vishnu Wasamkar , Head , Marathi , Willingdon, Sangli :

    शिंदे सर, आपण रत्नपारखींच्या ब्लॉगवर सुंदर प्रतिक्रिया लिहिली आहे. आचार्य अत्रे हे सव्यसाची लेखक होते. त्यांच्या 'क-हेचे पाणी' चे सर्व खंड मी वाचले आहेत. त्यांच्या 'झेंडूची फुले' हा विडंबन काव्याचा संग्रह मराठी काय इतर भाषांमध्येसुद्धा एकमेवाद्वितीय संग्रह आहे, असे माझे मत आहे . तुमची प्रतिक्रिया खूपच आवडली. धन्यवाद !!

    Me:

    डाॅ वि वा , मला खरोखर आनंद झाला , तुम्हाला टॅग करायचं राहिलं होतं, कृ माझ्या प्र वरील तुमची प्रतिक्रिया त्यांच्या ब्लाॅगवर थेट लिहा ना ! एक गमतीची गोष्ट राहून गेली सांगायची .. पर्वते जोशी गुरू शिष्यांचे बोलके मितभाष्य ... जेव्हा मी काव्यविहारींवरील तुमच्या लेखाचे कौतुक केले .... दुसरी गंमत तुम्ही 9370691812 ला वाॅटसप मेसेज पाठवल्याशिवाय मी तुम्हाला माझ्या ग्रुपमधे समा. करू शकत नाही

    Shriniwas Aasbe, Raja ramp u r I, Kolhapur :

    One small addition ...idea of revolving stage was commissioned in Kolhapur by late shri Mhadba mestri of Kolapur Auto for the play TO MI NAVHECH?

    आमच्या पिढीने अत्र्यांच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाची याेग्य ती दखल घेतली असली तरी नंतरच्या पिढीने त्यांच्याकडे काहींसे दुर्लक्षच केले आहे ंरत्नपारखींच्या लेखावरची तुमची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे ं

    Me:

    Yes Shriniwas Asbe लहानपणी महादेव असं लिहीलेली अग्निशामक बेडफोर्ड किंवा फार्गो ( Bedford Fargo ) प्रकारच्या सुंदर गाड्या आठवतात, तेच ते म्हादबा मिस्त्री असणार ... आठवतात या गाड्या ?

    Radhika Kullarni, Gandhi Bhavan, Pune :
    राजू, खूपच छान लिहिलंयस!
    झेंडूची फुले आणि कऱ्हेच्या पाण्याचा पहिला खंड कॉलेजकाळात वाचल्याचम स्मरतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शाळेत आम्हाला नवयुग वाचन माला अभ्यासाला होती.
    बालगंधर्व रंगमंदिरामधे अत्र्यांचं भाषण होतं त्यावेळी माझ्या वडिलांनी नेहमीप्रमाणे त्यांचंही व्याख्यान ऐकायला मला नेलं होतं. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचं निधन झाल्याचं मला आठवतंय. सोपं लिहिण्याची कला महाकठीण पण ती अत्र्यांना चांगलीच अवगत होती! शिक्षणविषयक त्यांचे विचारही पूर्वी कधीतरी वाचले होते. विद्यार्थ्यांच्या मनाचा सखोल विचार करणाऱ्या प्र. के. अत्रे या शिक्षकाला सादर वंदन!
    तुला आणि तुझ्या सहकारी प्राध्यापकांना शिक्षकदिनानिमित्त माझ्या शुभेच्छा!

    Me:

    शुभदा , Radhika Kulkarni , खूप समाधान वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून, मी भाग्यवान अत्र्यांचं व्याख्यान ऐकलेली मैत्रीण मिळाली .. . Vishnu Wasamkar and Shriniwas Asbe मनापासून आभार ! Allauddinj Shaikh Central Railway Mumbai , Dr Basavi Mukherjee , Shantiniketan, Kolkata, Dr Arvind Nawale , SRTM Nanded, Alka Darade, Nashik have liked the post ... !





    उत्तर द्याहटवा
  3. डाॅ रत्नपारखी, माझ्या प्रतिक्रियेवरील आपला टेक्स्ट मेसेज इथे प्रकाशित करा, मला खाजगी लिहीलेला मजकूर ब्लाॅग वाचणा़-यांना कसा समजणार ?

    उत्तर द्याहटवा
  4. डॉ. शिडे सर. आपली प्रतिक्रिया वाचली. मराठी साहित्यात विनोदी लेखक म्हणून पु.ल चा अधिक बोलबाल झाला हे मान्य आहे. आपण नुमूद केलेले जे विनोदी लेखक चि.वि. जोशी, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा परिचय आपल्याही पिढीला नीट झाला नाही. त्यांचे धडे आपल्याला असत एवढीच आठवण आपण सांगू शकतो. त्यांच्या साहित्यावर आजही विनोदी मालिका आणि चित्रपट होऊ शकतात. हा प्रयत्न काही प्रमाणात दिलीप प्रभावळकर यांनी 'चिमणराव'ची भूमिका करून केला. यात आचार्य अत्रे हे तर स्वतंत्र चित्रपटाचे विषय आहेत. त्यांना मात्र आपल्या मराठी मालिका आणि चित्रपट क्षेत्राने अजून न्याय दिला नाही.

    उत्तर द्याहटवा