बुधवार, २५ मार्च, २०२०

गतीच्या आशिर्वादाची पंच्चेचाळीस वर्षे !

     वारणानगर मध्ये बालपण गेले. माझे पूर्व प्राथमिक शिक्षण वारणा विद्या मंदिर मध्ये झाले. वारणा साखर कारखान्याने शिक्षण मंडळ स्थापन करून ही शाळा सुरु केली होती. शाळा ही तशी साधीच. शाळेपुढे एक पटांगण होते. याच मैदानावर झेंडावदन कार्यक्रम होत व्हायचा.  मी १९७२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे भाषण याच मैदानावर ऐकले होते. एरवी कार्यक्रम नसत त्यावेळी मुले खेळत राहत. अनेक माझ्या समवयस्क मुला मुलींनी याच मैदानावर सायकल शिकून घेतली. मला मात्र याचा हेवा वाटायचा.

   माझ्या बरोबरची अनेक मुले-मुली सायकल शिकून घरी काही तरी मदत करत. मला छोटी कामे करावी लागत. परंतु मात्र ती चालत जावून करावी लागत. मी अधून मधून सायकल शिकण्याचा प्रयत्न करीत आहे, वडिलांच्या लक्षात आले. ऐकेदिवशी वडिल सायकल वरून मला घेऊन शाळेच्या मैदानात आले. मैदानात इतर मुले सायकल चालवत होते. वडिलांनी मला सायकल मध्ये पाय घालून पायंडल मारायला सांगितले. मी प्रयत्न करीत होतो.परंतु पायंडलवर पुरेसा दाब पडत नव्हता. मी दोन चारवेळा प्रयत्न करून पाहिला. शेवटी वडिलांनी मागे धरून मला पायंडल मारण्याची सूचना केली. मी पायाने दाब वाढवत नेला आणि सायकल पुढे निघाली तसे वडिलांनी मागील आधार सोडला. शेवटी परिणाम असा झाला की, तोल जावून खाली पडलो. गुढघ्यावर खरचटून रक्त बाहेर आले. हातावर पडलो त्यामुळे वेदना जाणवू लागली. वडिल मला लगेचच शेजारी कारखान्याच्या दवाखान्यात घेऊन गेले. जखम पाहून त्यावर ड्रेसिंग केले गेले. घरी आल्यावर दुखणं थांबले नाही. आईला काळजी वाटली. एवढ्या लहानमुलाला सायकल शिकवू नका,असे तिने बाबांना सांगितले.

 चौथीला जाईपर्यंत वडिलच मला सायकलवर अनेक ठिकाणी घेऊन जात. मी मात्र पुढील नळीवर टाँवेल टाकून बसत राही. आपल्याला ही सायकल आली पाहिजे, हे मनोमन वाटायचं. हे आठवलं की, जखम आठवली जायची. शाळेत दरवर्षी गुढीपाडव्याला सरस्वती पूजन असायचे. मी पाडव्याच्या दिवशी पाटीवर सरस्वती काढून आणि पूजा साहित्य घेऊन शाळेत गेलो. वर्गशिक्षिका मालती गुणे मँडमनी सरस्वती पूजा का करायची ,हे सांगून पूजन करुन घेतले. सर्व मुलांना त्यांनी कडुनिंबाची पाने आणि नंतर गूळ खायला सांगितला. एक तासात शाळा सुटली. घरी आल्यावर काही वरिष्ठ गल्ली मित्र  सायकली चालवत होते. यापैकी काहींनी सायकल घेऊन ये, असे सुचविले. मी वडिलांना न सांगता सायकल घेऊन चालत मागे गेलो. माझे मित्र हे  वारणा कारखान्याच्या मुख्य दरवाजा जवळ जावून थांबले. रस्ता डांबरी आणि थोडा सखल होता. यावर त्यांनी सायकल स्पर्धा लावली. मी मात्र यात सहभागी होत नव्हतो,त्यांच्याही लक्षात आले. एका मित्राने मला नळीच्या मधल्या भागात पाय ठेवून उभे केले. शर्यत सुरू झाली आणि वाकबगार मित्र ती जिंकण्यासाठी जोरात सायकली चालवे लागले. मी पुन्हा एकदा पायंडलवर पाय देवून दाब वाढविला. सायकल पुढे निघाली. अर्धा पायंडल मारत सायकल अर्धा कि.मी पुढे गेली. माझे मित्र आश्चर्यकित झाले. मला पुन्हा उलट दिशेला नेऊन सायकल चालवायला सांगितले. मी त्याच मार्गावर सायकल चालवत घरी आलो.

वडील सायकल शोधत होते आणि मी अर्धा पायंडल मारत सायकल चालवत घरी येत आहे, हे त्यांना पाहून आनंद झाला. आठदिवसात फूल पायंडल आणि महिन्यात शीटवर बसून सायकल चालवायला लागलो. आज या घटनेला पंच्चेचाळीस वर्षे झाली. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा गतीचा आशिर्वाद मला देऊन गेला. मी वाहनांच्या घोळक्यात सायकल अधिक जवळची मानतो. याच सायकलने गती दिली. कोडोली हायस्कूल मधील शिक्षणात सायकल नेहमी बरोबर राहिली. आता मुंबई वास्तव्यात सायकल फिटनेस आणि व्यायामासाठी मदत देत आहे. आज गुढीपाडवा असल्याने जुनी आठवण जागृत झाली.
डॉ. संजय रत्नपारखी

रविवार, ८ मार्च, २०२०

                                आई

  आईने हे जग सोडून आता महिना पूर्ण झाला. विश्वास बसत नाही. आईची ओढ ही बहुधा ती गेल्यानंतर अधिक जाणवत राहते. गेली तीन वर्षे तिची तब्येत फारशी चांगली नव्हती.  जानेवारी नंतर तिने अंथरूण धरले आणि त्यातून ती बाहेर आली नाही. मी नोकरी निमित्ताने मुंबईत. दिनेश आणि दिप्तीने आईची सेवा केली. मी अधूनमधून घरी वारणानगरला आईला भेटायला जायचो. शेवटची भेट मे महिन्यात झाली. ती त्यानंतर  भेटली नाही.

  आईने आमच्यासाठी खूप काही केले. निगुतीने संसार सांभाळून तीन मुले मोठी केली. बाबांच्या नोकरीत दिवसरात्र सोबत राहिली. मला मोकळा श्वास घ्यायला कोडोली हायस्कूलच्या माध्यमातून संधी दिली. माझ्यावर कायम विश्वास ठेवला. मी तो अधिक सार्थक करण्याचा प्रयत्न करत राहिलो, याचे तिला मोठे समाधान होते. वारणानगरहून बाहेर पडून मला तीस वर्षे झाली. या तीस वर्षात आई मनाने माझ्या बरोबर राहिली. १९८९ मध्ये वारणेत घराचे काम सुरु झाले आणि मी बाहेर पडलो.घराची जागा आणि पूर्तता यात आईचे योगदान मोठे.

     आई -वडिल हे जगण्यातील मोठी शक्ती. ती काळाने गेल्या महिन्यात  कायमची काढून घेतली. काल हा सर्वांसाठी  नियम आहे, तो म्हणून आम्ही भावंडांनी स्वीकारला. बाबा २०१० मध्ये गेले आणि त्यानंतर ९ वर्षांनी आईने जग सोडले. आता वाकून नमस्कार करायला हक्काचे पाय मिळणार  नाहीत, या कल्पनेने जीव कासावीस होतो. आत्माप्रवास ही आपल्यासाठी एक कल्पना आहे. या कल्पनेचा आधार घेऊन मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करीन की, आमच्या आई -बाबांना आमच्याकडे पाहण्यासाठी संधी दे.

संजय भीमाशंकर-पुष्पा रत्नपारखी.

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

IS GOVERNMENT READY FOR A POLITICAL WILL?

In today's Times of India, Professor Arvind Panagariya has discussed on Higher Education Revolution through a new broad system and he suggested some new setup to make Indian Universities world-class. It's a good thing that Professor Panagariya is taking initiative for the new structure of Indian Higher Education. Last more than twenty-five years this discussion is going on through our educationist, planning boards and respective stakeholders of higher education. Indian academic leaders are hopeful for our university education to become world-class.

Nothing is wrong to see the dreams for development of higher education. After 1990 we are continually talking on the globalization of higher education. On this line, some new changes were introduced and tried to update the system. NAAC was established to major quality of higher education in 1994. Four-five years before, National ranking of higher education was introduced. Some results were came forward and we realized the present status of Indian higher education. Mostly renowned technical national institutes are taking lead-in the measurement. While mass education institutes are suffering in the process. These institutions have limited space in the national ranking due to their own problems of affiliated colleges and restriction of implementation of so-called autonomy of the state governments.

Yes, a government likes to introduce some reforms in the higher education with modification in the UGC, AICTE and other apex bodies. The Higher Education Promotion Commission (HEPC) is a big dream before the government and other stakeholders. But moving towards big reforms without major proper changes in higher education will affect on real growth of development. This ' proper changes' means to strengthen mass education and particularly in the conventional universities. The serious research is required on the present Indian education for measuring the real problem of the system. Give the new inputs not only money but freedom for their work, real autonomy and true support for preparing further world-class education. Education should be free from the present Indian politics and influence. Otherwise, the revolution in higher education is impossible in all ways. This is right time to take proper decision in the interest of our education system. This has required a political willingness. Is present government ready for this new move?

Dr Sanjay Ratnaparakhi
Mumbai